"अखंड सेवा, सक्षम नागरिक"

आमची यशोगाथा

पालघर जिल्ह्यातील जव्हार तालुक्यात वसलेले ढाढरी  ग्रामपंचायत हे निसर्गाच्या कुशीतील एक प्रगतीशील आणि सांस्कृतिक केंद्र आहे. ढाढरी (मुख्यालय), जांभुळमाथा या महसूल गावांसह , आम्ही सुमारे 1272 नागरिकांचे एक मजबूत कुटुंब आहोत

ढाढरी वैशिष्ट्य

येथील लोकजीवन पूर्णपणे शेतीवर आधारित आहे. शेतकरी भात, नागली, उडीद,तुर वरई, खुरसणी,कुळिद यांसारख्या पारंपरिक पिकांची लागवड करून कृषी संस्कृती जोपासतात. गावात 2 प्राथमिक शाळा आहेत 2 अंगणवाडी केंद्र आहेत, ज्यातून उद्याची पिढी घडत आहे. तसेच, 1 सभामंडप  आणि २ मंगल कार्यालये सामाजिक कार्यक्रमांसाठी उपलब्ध आहेत.समृद्ध जलस्रोत: ग्रामपंचायतीने पाणी व्यवस्थापनात महत्त्वपूर्ण काम केले आहे. येथे  पाण्याचे मोठे टाके, तलाव आणि  विहिरी अशा पाणीपुरवठा सुविधांमुळे जीवनमान सुकर झाले आहे.गावदेवी मंदिर हे श्रद्धेचे मुख्य केंद्र आहे, तर  हनुमान मंदिरे गावाच्या धार्मिक परंपरेची साक्ष देतात. विशेषतः, गावदेवी आणि डोगराल भाग येथील निसर्गरम्य परिसर गावाला एक वेगळी ओळख देतात.येथे 20 हून अधिक स्वयं सहाय्यता गट कार्यरत आहेत, जे महिलांना आर्थिक आणि सामाजिक प्रगतीसाठी बळ देतात.ढाढरी हे असे गाव आहे जिथे परंपरा आणि प्रगतीचा संगम साधला जातो, ज्यामुळे प्रत्येक नागरिकाला सन्मान आणि विकासाची संधी मिळते.

ढाढरी विविध शासकीय योजना प्रभावीपणे राबविल्या गेल्या आहेत. घरकुल योजना अंतर्गत लाभार्थी यांना घरकुल चा  लाभ मिळाला आहे. स्वच्छ भारत अभियान अंतर्गत गोरठण गावाने संपूर्ण खुले शौचमुक्त (ODF प्लस) दर्जा मिळवला आहे. जलसंधारण व पाणीपुरवठा योजना अंतर्गत गावात पाणीपुरवठा नियमित करण्यात आला आहे. तसेच संत गाडगे बाबा ग्राम स्वच्छता अभियान मध्ये ढाढरी ला विशेष गौरव पुरस्कार महाराष्ट्र शासन पुरस्कुत तंटामुक्ती गाव मोहीम अंतर्गत सन २०१३-२०१४ पारितोषिक प्राप्त गाव बक्षीस रुपये-४ लक्ष रुपये  प्राप्त झाला असून स्वच्छता अभियान पुरस्कारही जिल्हा व तालुका  पातळीवर मिळाला आहे.

ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच 8 सदस्य मिळून गावाचा सर्वांगीण विकास घडवून आणतात. ग्रामपंचायतीचे निर्णय लोकसहभागातून घेतले जातात.ढाढरी गाव आज जव्हार तालुक्यातील एक आदर्श व सर्वांगीण विकासाकडे वाटचाल करणारे गाव म्हणून ओळखले जाते.

ढाढरी गाव आज जव्हार तालुक्यातील एक आदर्श सर्वांगीण विकासाकडे वाटचाल करणारे गाव म्हणून ओळखले जाते

भौगोलिक स्थान

ढाढरी हे गाव जव्हार तालुक्याच्या ठिकाणापासून सुमारे 20 कि.मी. अंतरावर वसलेले आहे. गावाचे एकूण लागवडी योग्य क्षेत्रफळहे आर असून ग्रामपंचायतीमध्ये 02 महसुली गावे आहेत (ढाढरी,जांभुळमाथा) आहेत. सर्व गाव पाडे हे विखुरलेल्या स्वरूपात असून ग्रामपंचायत मुख्यालयापासून ०५ km अंतरापर्यंत वसलेले आहेत.एकूण482 कुटुंबे येथे वास्तव्यास असून, लोकसंख्या 1272 आहे. त्यामध्ये  646 पुरुष 626 महिला यांचा समावेश होतो.

गावाचा भौगोलिक विस्तार प्रामुख्याने डोंगराळ असून शेतीयोग्य जमीन मोठ्या प्रमाणात आहे. येथे हवामान उष्णकटिबंधीय आहे; उन्हाळ्यात तापमान साधारणतः ३९°से. पर्यंत जाते, तर हिवाळ्यात १५°से. पर्यंत खाली येते. पावसाळ्यात सरासरी ६० ते ७० से.मी. पर्जन्यवृष्टी होते.

लोकजीवन

ढाढरी गावाचे लोकजीवन साधे, श्रमप्रधान पारंपरिक आहे. शेती हा येथील मुख्य व्यवसाय असून भात, नागली, उडीद, खुरासणी, वरई, तूर, कुळीदपिके मोठ्या प्रमाणावर घेतली जातात. शेतीसह काही लोक दुग्धव्यवसाय, यामध्येही कार्यरत आहेत.

गावात विविध सामाजिक, सांस्कृतिक धार्मिक परंपरा जोपासल्या जातात. वर्षभरात होणारे उत्सव, सण आणि गावात भरवला जाणारा साप्ताह गावाच्या एकतेचे दर्शन घडवतो. गणेशोत्सव, होळी, दिवाळी, नवरात्र तसेच स्थानिक देवतांच्या पूजांना विशेष महत्त्व आहे.

येथील लोक मेहनती, मदतशील अतिथी देवो भव  या विचाराने वावरणारे आहेत. स्त्रियांचा सहभाग ग्रामविकास स्वयंसाहाय्य गटांद्वारे मोठ्या प्रमाणात दिसून येतो. तरुण वर्ग शिक्षण, खेळ आणि रोजगाराच्या संधी शोधत प्रगतीच्या दिशेने वाटचाल करीत आहे.

ढाढरी च्या लोकजीवनात पारंपरिक ग्रामीण संस्कृतीसोबतच आधुनिकतेची झलकही दिसते, ज्यामुळे गावाचा विकास आणि एकात्मता दोन्ही जोपासले जातात.

प्रशासकीय स्थिती

प्रशासन आणि लोकसहभाग: ग्रामपंचायत लोकनियुक्त अध्यक्ष (सरपंच), उपअध्यक्ष (उपसरपंच) 7 सदस्य मिळून गावाचा सर्वांगीण विकास घडवून आणतात. ग्रामपंचायतीचे निर्णय लोकसहभागातून घेतले जातात.

संस्कृती परंपरा

धार्मिक केंद्र: गावदेवी मंदिर (ढाढरी हे ग्रामाचे धार्मिक केंद्रबिंदू आहे.तसेच

ढाढरी गावाचे सांस्कृतिक जीवन समृद्ध आणि विविधतेने नटलेले आहे. येथे वर्षभर विविध धार्मिक,श्रावण सप्ताह, सामाजिक सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जातातगावातील प्रमुख देवतांच्या पूजाअर्चा सप्ताह यामुळे ग्रामस्थांमध्ये एकोपा आणि श्रद्धेची भावना दृढ होते,

गणेशोत्सव, नवरात्र, दिवाळी, होळी यांसारखे सण गावात उत्साहाने साजरे केले जातात. या सणांमुळे गावातील मुलं, तरुण वयोवृद्ध सर्वच वयोगट एकत्र येऊन आनंदोत्सव साजरा करतात.

गावात लोककला, कीर्तन, भजन आणि पारंपरिक खेळ यांचा विशेष प्रभाव दिसून येतो. पिढ्यान्पिढ्या चालत आलेल्या परंपरा जपतानाच नवीन पिढी आधुनिकतेशी जुळवून घेते. स्त्रियांचा सहभाग ग्रामविकासात तसेच सांस्कृतिक उपक्रमांमध्ये मोठ्या प्रमाणावर असतो. स्वयंसहाय्य गटांद्वारे महिला सामाजिक आर्थिक प्रगतीत योगदान देतात.

क्र

नाव

पद

1.      

श्री. बबन शंकर अकणे

सरपंच

2.      

श्री.सुभाष धनजी भोरे

उपसरपंच

3.      

श्री.दिपक चिंता माडी

सदस्य

4.      

श्री.अर्चना दिपक माडी

सदस्या

5.      

सौ.कमळी सका बारडी

सदस्या

6.      

श्री.कासम भिवा अकणे

सदस्य

7.      

सौ.मंगी मर्हा अकणे

सदस्य

8.      

सो.शेवंती बाबु ढिगारे

सदस्या

प्रशासकीय संरचना


भारतातील पंचायती राज हे ग्रामीण स्थानिक स्वराज्य प्रणालीचे प्रतीक आहे.

जन्म, मृत्यू व विवाह यांची नोंदणी अवश्य करा...

लोकसंख्या आकडेवारी


115
551
266
285

Logo
Logo
Logo
Logo
Logo
Logo
Logo
Logo
Logo