आमची यशोगाथा
पालघर जिल्ह्यातील जव्हार तालुक्यात वसलेले ढाढरी ग्रामपंचायत हे निसर्गाच्या कुशीतील एक प्रगतीशील आणि सांस्कृतिक केंद्र आहे. ढाढरी (मुख्यालय), जांभुळमाथा या महसूल गावांसह , आम्ही सुमारे 1272 नागरिकांचे एक मजबूत कुटुंब आहोत
ढाढरी वैशिष्ट्य
येथील लोकजीवन पूर्णपणे शेतीवर आधारित आहे. शेतकरी भात, नागली, उडीद,तुर वरई, खुरसणी,कुळिद यांसारख्या पारंपरिक पिकांची लागवड करून कृषी संस्कृती जोपासतात. गावात 2 प्राथमिक शाळा आहेत 2 अंगणवाडी केंद्र आहेत, ज्यातून उद्याची पिढी घडत आहे. तसेच, 1 सभामंडप आणि २ मंगल कार्यालये सामाजिक कार्यक्रमांसाठी उपलब्ध आहेत.समृद्ध जलस्रोत: ग्रामपंचायतीने पाणी व्यवस्थापनात महत्त्वपूर्ण काम केले आहे. येथे पाण्याचे मोठे टाके, तलाव आणि विहिरी अशा पाणीपुरवठा सुविधांमुळे जीवनमान सुकर झाले आहे.गावदेवी मंदिर हे श्रद्धेचे मुख्य केंद्र आहे, तर हनुमान मंदिरे गावाच्या धार्मिक परंपरेची साक्ष देतात. विशेषतः, गावदेवी आणि डोगराल भाग येथील निसर्गरम्य परिसर गावाला एक वेगळी ओळख देतात.येथे 20 हून अधिक स्वयं सहाय्यता गट कार्यरत आहेत, जे महिलांना आर्थिक आणि सामाजिक प्रगतीसाठी बळ देतात.ढाढरी हे असे गाव आहे जिथे परंपरा आणि प्रगतीचा संगम साधला जातो, ज्यामुळे प्रत्येक नागरिकाला सन्मान आणि विकासाची संधी मिळते.
ढाढरी विविध शासकीय योजना प्रभावीपणे राबविल्या गेल्या आहेत. घरकुल योजना अंतर्गत लाभार्थी यांना घरकुल चा लाभ मिळाला आहे. स्वच्छ भारत अभियान अंतर्गत गोरठण गावाने संपूर्ण खुले शौचमुक्त (ODF प्लस) दर्जा मिळवला आहे. जलसंधारण व पाणीपुरवठा योजना अंतर्गत गावात पाणीपुरवठा नियमित करण्यात आला आहे. तसेच संत गाडगे बाबा ग्राम स्वच्छता अभियान मध्ये ढाढरी ला विशेष गौरव पुरस्कार महाराष्ट्र शासन पुरस्कुत तंटामुक्ती गाव मोहीम अंतर्गत सन २०१३-२०१४ पारितोषिक प्राप्त गाव बक्षीस रुपये-४ लक्ष रुपये प्राप्त झाला असून स्वच्छता अभियान पुरस्कारही जिल्हा व तालुका पातळीवर मिळाला आहे.
ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच 8 सदस्य मिळून गावाचा सर्वांगीण विकास घडवून आणतात. ग्रामपंचायतीचे निर्णय लोकसहभागातून घेतले जातात.ढाढरी गाव आज जव्हार तालुक्यातील एक आदर्श व सर्वांगीण विकासाकडे वाटचाल करणारे गाव म्हणून ओळखले जाते.
ढाढरी गाव आज जव्हार तालुक्यातील एक आदर्श व सर्वांगीण विकासाकडे वाटचाल करणारे गाव म्हणून ओळखले जाते
भौगोलिक स्थान
ढाढरी हे गाव जव्हार तालुक्याच्या ठिकाणापासून सुमारे 20 कि.मी. अंतरावर वसलेले आहे. गावाचे एकूण लागवडी योग्य क्षेत्रफळ — हे आर असून ग्रामपंचायतीमध्ये 02 महसुली गावे आहेत (ढाढरी,जांभुळमाथा) आहेत. सर्व गाव पाडे हे विखुरलेल्या स्वरूपात असून ग्रामपंचायत मुख्यालयापासून ०५ km अंतरापर्यंत वसलेले आहेत.एकूण —482 कुटुंबे येथे वास्तव्यास असून, लोकसंख्या 1272 आहे. त्यामध्ये 646 पुरुष व 626 महिला यांचा समावेश होतो.
गावाचा भौगोलिक विस्तार प्रामुख्याने डोंगराळ असून शेतीयोग्य जमीन मोठ्या प्रमाणात आहे. येथे हवामान उष्णकटिबंधीय आहे; उन्हाळ्यात तापमान साधारणतः ३९°से. पर्यंत जाते, तर हिवाळ्यात १५°से. पर्यंत खाली येते. पावसाळ्यात सरासरी ६० ते ७० से.मी. पर्जन्यवृष्टी होते.